आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:अबॅकस स्पर्धेमध्ये इन्स्टिट्यूट मधील‎ दोन विद्यार्थ्यांचे यश‎

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये‎ डीआयआयटी अबॅकस इन्स्टिट्यूट मधील दोन‎ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व जिल्ह्यातील‎ विभागीय स्पर्धेमधील पात्र विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा‎ घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये डीआयआयटी‎ अबॅकस इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी पात्र झाले होते.या‎ विद्यार्थ्यांनी पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग‎ घेऊन आपले नाव उज्वल केले आहे.

स्पर्धेमध्ये‎ शेकडो विद्यार्थ्यांमधून उमर सय्यद, इशिता ठाकूर‎ यांनी उत्कृष्टपणे पाच मिनिटांमध्ये गणिते सोडवून यश‎ संपादन केले आहे.या राज्यस्तरीय स्पर्धे प्रसंगी‎ प्रोऍक्टिव्ह अबॅकस कंपनीचे संचालक गिरीश करडे,‎ राज लोचनी, अजय मनियार, तेजस्विनी सावंत,‎ सारिका करडे, प्रोऍक्टिव्हची टीम उपस्थित‎ होती.विद्यार्थ्यांच् या यशाबद्दल ज्ञानेश्वरी शिक्षण‎ प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके,‎ डीआयआयटी अबॅकस इन्स्टिट्यूटच्या संचालिका‎ सोनाली घोडके यांच्या वतीने अभिनंदन करण्यात‎ आले. कार्यक्रमाप्रसंगी पालक शबाना मुल्ला, कोमल‎ ठाकूर आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...