आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यस्तरीय योंगमुडो स्पर्धेत उमरग्याच्या खेळाडूंचे यश; कोरियन मार्शल आर्ट प्रकारात ७ खेळाडूंना सुवर्णपदके ६ जणांना रौप्य

उमरगा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा येथे ३० व ३१ जुलै रोजी पार पडलेल्या ७ व्या राज्यस्तरीय योंगमुडो स्पर्धेत उमरग्याच्या खेळाडूनी ७ सुवर्णपदकासह ६ रौप्यपदक मिळवित चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. योंगमुडो हा कोरियन मार्शल आर्ट प्रकार आहे.

कोल्हापूर , सांगली , औरंगाबाद, बीड , उस्मानाबाद , पुणे येथील जवळपास २५० खेळाडूनी भाग घेतला होता . मुलांच्या व मुलींच्या गटामध्ये १४ , १७ , १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटात व विविध वजन गटामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. शहरातील आशा मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय ७ व्या योंगमुडो राज्यस्तरीय स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मणराव टोंपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योंगमुडो इंडियन फेडरेशन संस्थापक अध्यक्ष रोहित नारकर, महाराष्ट्र योंगमुडो असोसिएशनचे सचिव प्रविण होल्ले, महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रताप राठोड, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, गिरीष सुर्यवंशी, ईस्माईल शेख, अनिल सगर, विजय तळभोगे, अनिता जाधव, प्रा.भाग्यश्री गुंड, कविता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून जवळपास २५० खेळाडूनी भाग घेतला होता. या स्पर्धा मुला मुलींच्या ११, १४ व १७ अशा विविध वयोगटातील वेगवेगळ्या वजन गटात खेळविण्यात आल्या. यामध्ये उस्मानाबाद संघाकडून खेळताना उमरग्याच्या खेळाडूनी विशेष प्राविण्यासह जिल्ह्याला द्वितीय क्रमांक मिळवून दिला. स्पर्धेत सांगली व कोल्हापूर जिल्हयाने सर्वाधिक पदके मिळवून प्रथमक्रमांक तर उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयाने व्दितीय क्रमांक मिळविला.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उस्मानाबाद जिल्हा योंगमुडो असोशिएशनचे पदाधिकारीरोहिणी बनसोडे, ओम राठोड, संकेत राक्षे, विजय चव्हाण, विलास राठोड आदीनी परिश्रम घेतले. यावेळी खेळाडूचे पालक उपस्थित होते.

विविध खेळाडूंचे यश
११ वर्षे वयोगटातुन मुलींमधून किर्ती माने , भार्गवी पवार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर १४ वयोगटातुन ४८ किलोतून समृध्दी पवारने प्रथम , ३६ किलो वयोगटातुन यशश्री माने व्दितीय क्रमांक मिळविला. ३६ किलो वजनी गटातून प्राची भोसले द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगटातुन हर्षदा चाकुरे प्रथम, श्रावणी मुळजे द्वितीय , १४ वर्षे वयोगटातून विष्णुपंत पंचमहाल प्रथम , महेश पंचमहल द्वितीय , १७ वर्षे वयोगटातुन सत्यगणेश गालीपिली ,प्रणव भोसले व्दितीय क्रमांक मिळविला. मुलींच्या १९ वर्षे वयोगटातुन प्रतिक्षा राठोड, स्वाती भालेराव व अश्विनी भालेराव प्रथम तर मुलांमध्ये धिरज राठोड प्रथम क्रमांक पटकाविला.

बातम्या आणखी आहेत...