आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खेळामध्येही यशस्वी कामगिरी

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धांमध्ये येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळामध्येही उत्तम कामगिरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ लोणेरे यांच्यावतीने नुकत्याच विभागीय स्तरावरील स्पर्धेचे सोलापूर येथे आयोजन केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या मुली व मुलांच्या दोन्हीही संघाने भाग घेतला होता. यामध्ये मुलीच्या संघाने विजेतेपद पटकावले. यामध्ये अवंती माने , निकिता कदम आणि अभिषेक रोकडे यांची धुळे येथे होणाऱ्या इंटर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली.

तर विभागीय स्तरावरील लातूर येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये याच महाविद्यालयाच्या ओंकार काळे यांनेही चांगली कामगिरी करत अंतरविभागीय स्पर्धेत पर्यंत धडक मारली.नुकत्याच ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर यादरम्यान कोल्हापूर मध्ये झालेल्या महाराष्ट्र ज्युदाे असोसिएशन तर्फे ४९ व्या जुनियर महाराष्ट्र राज्य जुडो चॅम्पियनशिप आणि नॅशनल सिलेक्शन ट्रायल या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागाचा ओंकार चौरे याने तृतीय क्रमांक मिळविला.

तसेच त्याची ज्युदाे या खेळासाठी पुण्याला होणाऱ्या ज्युनिअर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली. सिव्हिल विभागाच्या द्वितीय वर्षातील रेणुका शिंदे हिची जिल्हास्तरीय कराटे पंच म्हणून नियुक्ती झाली. अभ्यासक्रमासोबतच महाविद्यालयाच्या विविध विभागातील मुलांनी खेळामध्येही विद्यापीठापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत केलेल्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल नुकताच महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...