आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासवारी उंटावर नियमित उपचार करुन उस्मानाबाद येेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील विजयकुमार जिंतपुरे यांनी प्राण वाचवले आहेत. उंट हा प्राणी ओझे घेऊन दिवसाला ३० ते ३५ मैल तर कोणत्याही ओझ्याशिवाय ७० ते ८० मैल प्रवास तहान व भूक न लागता करू शकतो. अशाच एका सवारी उंटाला मागील काही दिवसापासून पुढील पायास दुखापत झाली.
त्याला व्यवस्थित चालता येत नसल्याने उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात उपचारासाठी आणले. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील विजयकुमार जिंतपुरे यांनी योग्य ते निदान करून उपचार केले.उंट मालक रत्नाकर जगताप यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.दीपक कदम , डॉ.सुदर्शन मुंडे, डॉ.विक्रम मगर व इतरांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.