आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:वाशीतील जिल्हा परिषद शाळेला उपशिक्षणाधिकारी यांची अचानक भेट

वाशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा परिषद शाळेला उपशिक्षणाधिकारी डॉ.अरविंद मोहरे यांनी सोमवारी अचानक भेट देऊन गुणवत्ता व नियोजनाची तपासणी केली.

इयत्ता १ ली ते ४ थी वर्ग असलेल्या शिवशक्ती नगर शाळेला दुपारी ही भेट देण्यात आली. यावेळी डॉ.मोहरे व शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन, गणित याचा अभ्यास घेऊन गुणवत्तेची चाचणी घेतली. त्याच बरोबर शाळेतील स्वच्छ्ता,शिस्त,सुंदर माझे कार्यालय या विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून सुंदर माझे कार्यालय अंतर्गत साकारलेली कुंडीतील बाग व इतर उपक्रमाची पाहणी केली. शिक्षणासाठी असलेल्या सर्व बाबी समाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी विद्यार्थी शिक्षक यांचे कौतुक केले. शाळेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा देवळे, सहशिक्षिका नंदूबाई उकरंडे,छाया अंधारे,सुनीता वाकडे सहशिक्षक लिंबराज कोरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...