आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाडीतून काहीही निष्पन्न झाले नाही:कर्ज घेऊन साखर कारखाने उभारले ; विरोधकांच्या तक्रारीतून कारवाई

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाराशिव साखर कारखाना तथा पंढरपूरच्या डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे कार्यालय व कारखान्यांवरील आयकर विभागाची कारवाई संपली असून, सोमवारी पहाटे आयकर विभागाचे पथक परतले. यासंदर्भात माहिती देताना चेअरमन पाटील म्हणाले की, पथकाला विरोधकांनी चुकीची माहिती दिली होती. ‘कारखाने एकामागून एक कसे आले, इतका पैसा कुठून आला’, अशी विचारणा झाल्यानंतर आम्ही पथकाला कारखाने कर्ज घेऊन उभारल्याचे सांगितले असून, त्यावर पथकाचे समाधान झाले आहे.

चेअरमन पाटील म्हणाले, आम्ही काही कारखाने कर्ज घेऊन भाडे तत्वावर घेतले आहेत. त्यामुळे त्याला भांडवलाची गरज नाही. जे काही होते ते सगळे रेकॉर्डवर होते.धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने किंवा इतर मालमत्ता सापडली नाही. त्यांना दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली व काही कागदपत्रांसाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे, ती कागदपत्रे वेळेत दिली जातील. गेल्या २ महिन्यातली पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक लढवली, त्यात मला यश आले. त्यामुळे माझा वारू रोखला पाहिजे, यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले. असा पाटील यांनी आरोप केला.विठ्ठल कारखाना माझ्याकडे शेतकरी सभासदांनी दिला त्यानंतर आयकर विभागाच्या कारवाईत काही न सापडल्याने मी उजळ माथ्याने फिरू शकतो. जे काही केले कमविले ते प्रामाणिकपणे केले. राजकीय विरोधातून हे सगळे केले गेले, विरोधकांना सजाच तसे उत्तर दिले जाईल, विरोधकांचे नाव सगळ्यांना माहित आहे ते योग्य वेळी जाहीर करू,असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...