आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको आंदोलन:ऊस दर संघर्ष समितीचे दरवाढीसाठी आंदोलन ; टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

टेंभुर्णी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसात पहिली उचल २ हजार ५०० रुपये व अंतिम दर ३१०० रुपये जाहीर न केल्यास पंढरपूर येथे ४४ साखर कारखानदारांचे दशक्रिया विधी आंदोलन करू, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी दिला. टेंभुर्णी-कुर्डुवाडी मार्गावर सोलापूर-पुणे महामार्ग बायपास चौकात ऊस संघर्ष समिती शेतकरी संघटनांचा वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.

आंदोलक कार्यकर्त्यांवर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संजय कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्वत: ताब्यात घेतले पाहिजे तरच जास्तीचे पैसे मिळणार आहेत. यंदा पुरेसा ऊस नसल्याने गाळपाची काळजी करू नये. कारखानदार शेतकऱ्यांना कुठेही काटा करून आणण्याचे आवाहन करतात. मात्र कोठे खासगी वजन काट्यावर वजन करू दिले जात नाही. वजन चोरून रिकव्हरी कमी दाखवली जाते.

यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. बेंबळे (ता. माढा) येथील प्रशांत भोसले यांची हत्या मध्य प्रदेशात झाली. त्याची सुनावणी महाराष्ट्रात होण्याची मागणी अतुल खुपसे यांनी केली. दीपक भोसले यानी विचार मांडले. संजय पाटील घाटणेकर, अतुल खुपसे, दीपक भोसले, समाधान फाटे, प्रा. सुहास पाटील, माउली हळनवर, पोपट अनपट, सतीश सुर्वे, महेश पाटील, सुरेश पाटील, विठ्ठल मस्के, परमेश्वर खरात, नानासाहेब ढवळे, सजन ढवळे यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...