आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळदुर्ग:‘आपलं घर’ येथील अनाथ मुलांना साखरहार

नळदुर्ग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाबोले यांनी गुढीपाडव्याच्या सणाचे औचित्य साधुन २ एप्रिल रोजी नळदुर्ग येथील आपलं घर प्रकल्पातील अनाथ मुलांना साखरेच्या हाराचे वाटप करून गुढीपाडव्याचा सण साजरा केला. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहत होता.आपलं घर येथील ९० अनाथ विद्यार्थ्यांना साखरेच्या हाराचे वाटप करून त्यांच्या सोबत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. आपलं घर येथील सभागृहात झालेल्या या हार वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विनायक अहंकारी, विस्तार अधिकारी बाळासाहेब महाबोले, विलास येडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, उमेश जाधव, पिंटू जाधव आदीजन उपस्थित होते.

प्रारंभी येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले यानंतर आपलं घरच्या वतीने सर्व मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मुलांना साखरेच्या हाराचे वाटप करण्यात आले. सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबविला जात आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाभिक समाजाचे महादेव माने सचिन काळे, संतोष महाबोले, स्वप्नील सुरवसे, राम सोमवसे, बालाजी सुरवसे, शरद कटारे यांनी परिश्रम घेतले. अनाथ मुलांना आपलं घर वाटावं, त्यांच्या जीवनाला आधार मिळावा यासाठी या संस्थेची स्थापन करण्यात आली आहे. विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजनही केले जाते. या ठिकाणी विविध परिसरातील मुले आणि मुली आहेत.

बातम्या आणखी आहेत...