आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:श्री तुळजाभवानी साखर कारखान्यात ऊस तोडणी, वाहतूक कराराचा शुभारंभ

नळदुर्ग23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून येथील तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याने रविवारी (दि.१) २०२२-२३ मधील हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ केला.

तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी यावर्षी गोकुळ शुगरच्या मदतीने १० वर्षांपासून बंद असलेला कारखाना चालू करून परिसरातील जवळपास ४० हजार टन उसाचे गाळप करत चाचणी हंगाम यशस्वी केला. पुढील वर्षीच्या ऊस गाळप हंगामासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील वाहतूक कंत्राटदार व ऊस तोडणी कामगारांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी गोकुळ शुगर इंडस्ट्रीचे चेअरमन दत्ता शिंदे, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, कार्यकारी संचालक विकास भोसले, गोकुळचे जनरल मॅनेजर प्रदीप पवार, ऊस पुरवठा अधिकारी जी. एस. पटेल, व शेतकीचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. या वेळी ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार लक्ष्मण पवार, मार्कंड शिंगाडे, सुरेश राठोड, तिप्पांना कबाडे, लक्ष्मण बांगर, जितू चंदिले, सुशील चौधरी व वाहतूक ठेकेदारांसोबत सामंजस्य करार करण्यात आला.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभवानी कारखाना गोकुळच्या सहकार्याने पुढील हंगामात पूर्ण क्षमतेने चालू होणार आहे. तुळजापूर तालुक्यात जवळपास ११ लाख टन ऊस आहे. त्यातील जास्तीत-जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक व तोडणी कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन सुनील चव्हाण यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...