आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुरक्षा हीच मोठी उपाययोजना असल्याची सूचना; लोंबकळणाऱ्या तारा धोकादायक

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा सुरू होताच वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीज प्रवाह खंडित होणे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांत घर्षण होऊन ठिणग्या उडणे, असे प्रकार घडतात. सोबतच घरगुती वीज उपकरणे, वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यामुळे पावसामुळे वीज प्रवाह इतरत्र उतरण्याचे प्रकार घडतात. सुरक्षा म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महावितरणनेही केले आहे.

पावसाळ्यात ग्रामीण भागांसह शहरात आणि शेतीतही विजेचा धक्का लागून हानी होण्याच्या घटना घडतात. यात अनेकांना प्राण गमवावे लागत असून हातपाय निकामी होण्याचेही प्रकार घडले आहेत. वीज ग्राहकांनी सावधगिरी बाळगली तर होणारे वीज अपघात टाळता येणे शक्य आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, खांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेती पंपाचा स्वीच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटनेची शक्यता अधिक असते.

या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने कधी कधी वीज खांब वाकला जातो. परिणामी वीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास कळविण्याचे आवाहन आहे.

शेतकऱ्यांनीही घ्यावी काळजी
शेतात अनेक शेतकऱ्यांना सद्या विहिरींच्या पाण्याची आवश्यकता पडत नाही. मात्र, त्यानंतरही त्यांचे कनेक्शन उघडे असते. त्याचे वायरही खाली लोळत असते. अनेकदा ते उघडेच असतात. पावसाच्या पाण्यामुळे त्यातून करंट पसरण्याची भिती असते. त्यामुळे असे कनेक्शन सुरक्षीत करावे, अथवा काही काळ ते बंद केले तरी, चालेल.

अशी घ्यावी खबरदारी...
स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क नको.
वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग हवे.
शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच बंद करावा.
दूरचित्रवाणीची डिश, अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावा.
ओल्या कपड्यांवर इस्त्री फिरवू नये, उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे.
टिनपत्र्याच्या घरात खबरदारी घ्यावी.
विजेच्या खाबांना जनावरे बांधू नये, दुचाकी टेकवून ठेऊ नये किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.

या क्रमांकावर करा संपर्क
शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटर्सचे १९१२,१८१८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. असे कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...