आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड‎:खडकी उपसरपंचपदी मविआचे‎ सुखदेव राखुंडे बिनविरोध

डिकसळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील खडकी‎ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी‎ महाविकास आघाडीचे सुखदेव‎ राखुंडे यांची बिनविरोध निवड‎ करण्यात आली आहे. मंगळवारी‎ नवनियुक्त सरपंच सौ. अस्मिता‎ बालाजी राखुंडे यांच्या‎ अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत‎ कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत‎ ही निवड करण्यात आली आहे.‎ महाविकास आघाडीने सात‎ जागांपैकी सरपंचासह चार जागांवर‎ विजय मिळवला होता. उपसरपंच‎ पदासाठी एकमेव सुखदेव राखुंडे‎ याचा अर्ज आल्याने त्यांची‎ बिनविरोध निवड झाल्याचे‎ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी‎ जाहीर केलं.‎

या निवडीच्या वेळी नवनियुक्त‎ ग्रामपंचायत सदस्य भंडारे‎ बाळासाहेब, गिरी सखुबाई, राखुंडे‎ सुखदेव, अंजली राखुंडे, आण्णा‎ राखुंडे , उषा तांबारे, सुलन शिंदे‎ उपस्थित होते.‎ निवडीनंतर रामकिसन राखुंडे ,‎ दादा विटेकर , बिबिषण राखून,‎ आश्रुबा राखुंडे, पिंटू अंधारे,‎ रोहिदास राखुंडे, हनुमंत नाईकनवरे,‎ बाप्पा राखुंडे, महादेव भंडारे ,‎ अशोक राखुंडे आदी ग्रामस्थानी‎ नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व‎ सदस्यांचा सत्कार केला.‎ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून‎ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी‎ एस. एस. शटगार यांनी कामकाज‎ पाहिले तर त्यांना सहाय्य ग्रामसेवक‎ श्रीमती एस. आर. साळुंके यांनी‎ केले. निवडीनंतर फटाके फोडून‎ गावकऱ्यांनी जल्लोष केला.‎

बातम्या आणखी आहेत...