आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सूर्य 15 जूनपासून महिनाभरासाठी मिथुन राशीत ; लक्ष्मीनारायण योग शुभ, अंगारक अशुभ

उस्मानाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दोन मित्र ग्रह सूर्य-मंगळ या राशींच्या परिवर्तनासह दैत्यगुरू शुक्र देखील राशीत परिवर्तन करणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य १५ जूनपासून महिनाभरासाठीच मित्र राशी मिथुन या राशीत प्रवेश करणार आहे. या राशींसाठी चांगले संकेत असेल. तिसऱ्या दिवशी १८ जूनला सुस्थित योगात दैत्यगुरू शुक्र आपल्या स्वराशी वृषभ या राशीत प्रवेश करणार आहे. तेथे बुधाबरोबर लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. तर २७ जूनला सकाळी ५.३८ वाजता मंगळ ग्रह आपल्या मूळ त्रिकोण राशी मेष मध्ये प्रवेश करून तेथे पूर्वीच असलेल्या राहू बरोबर अंगारक योग बनवेल. तीन ग्रह राशींचे परिवर्तन तथा लक्ष्मीनारायण अंगारक योगामुळे काही शुभ-अशुभ घटनाचक्र भूतलावर पाहायला मिळेल. शुक्र व बुधच्या युतीने लक्ष्मीनारायण योगामुळे विकासाची गती वाढेल. भौतिक सुख-संपन्नता नांदणार. कृषी उत्पन्नात विकास, राजकारणाच्या दृष्टिकोनातून या काळात शुभ प्रभाव पडेल. बालकांचे आजार कमी हाेतील. मात्र, मंगळ राहूच्या युतीने येणारा अंगारक योग राजनैतिक द्वेष वाढवण्यासह आपराधिक घटनांत वाढ करेल. प्राकृतिक प्रकोपासह जन संपत्तीची हानी करेल. देशाचा उत्तर व दक्षिण भाग यामुळे अधिक प्रभावित होईल. विशेष म्हणजे दर महिन्याला सूर्य प्रत्येक राशीत भ्रमण करत असतो. त्याचे परिणाम दिसून येतात. मकर राशीत सूर्याच्या संक्रमानाला मकर संक्रांत असते.

या काळात सूर्याचे तेज अधिक वाढते या काळात सूर्य जास्त तेजस्वी होतो. त्यामुळे त्याचा इतर ग्रहांवरही परिणाम होत असतो. सूर्याच्या संक्रमणामुळे मंगळ, बुध आणि शनी ज्या राशींचे स्वामी आहेत, अशा राशींना त्रास होईल. मकर राशीत सूर्य असल्याने चांगला लाभ होण्याचे संकेत आहेत. उमेश जोशी, ज्योतिष तथा वेदांगचार्य.

असा राहील राशींवर प्रभाव; इष्ट देवतेची आराधना करण्याचा सल्ला मेष : मानसिक अस्थिरतेसह कमाईचे साधन वाढतील. शुभकार्यात व्यग्र, स्वकीयांकडून संयोग. वृषभ : संपत्तीच्या नुकसानीसह उत्पन्नाच्या मार्गात वाढ. मिथुन : राजनैतिक क्षेत्राकडून लाभ मिळणार. कर्क : आई-वडिलांच्या स्वास्थ्यात कमी. सिंह : शिक्षण व संतान संबंधित सुख वाढेल. कन्या : गुप्त शत्रू हानी पोहोचवण्याची शक्यता. तूळ : भागीदारी व दाम्पत्य सुखात अडथळा. वृश्चिक : स्वास्थ्यावर लक्ष ठेवा. धनू : संतानाबाबत चिंता वाढेल. मकर : जमिनीबाबत विवाद वाढतील. कुंभ : भौतिक सुख-संपन्नतेत वाढ, राजकारणी मित्रांपासून लाभ. मीन : पारिवारिक त्रासाने मन दु:खी राहील.

बातम्या आणखी आहेत...