आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:मलंग विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांसाठी‎ सुपर स्पेशल वर्गाव्दारे मार्गदर्शन‎

उमरगा‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शरणप्पा मलंग‎ विद्यालयात इयत्ता दहावीच्या‎ विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाच्या टॉपर‎ ४० मुलांच्या स्पेशल बॅचला सुरुवात‎ झाली. हैदराबाद, लातूर येथून‎ मागवलेल्या तज्ञ शिक्षक यांचे‎ मार्गदर्शन दहावी विद्यार्थ्यांना शाळेत‎ मिळण्याची व्यवस्था करण्यात‎ आली आहे.‎ विद्यालयात या स्पेशल वर्गासाठी‎ प्रोजेक्टर आणि एलईडी टीव्ही व‎ ई-लर्निंगच्या माध्यमातून विज्ञान,‎ गणित व इंग्रजीमध्ये देशातील टॉप‎ विद्यार्थ्यांसोबत कॉन्फरन्समध्ये भाग‎ घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार‎ आहे. अगदी सुंदर हस्ताक्षरापासून ते‎ उत्कृष्ट उत्तर पत्रिका कशी लिहावी‎ याचे तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन करून सराव घेण्यात‎ येणार आहे.

हे प्रशिक्षण सहा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मार्चपासून ते सहा मेपर्यंत या एक‎ महिन्याच्या कालावधीसाठी‎ आयोजित केले आहे. इतर‎ शाळेतील मुलांनाही नाममात्र फीस‎ भरून सहभागी होण्याची व्यवस्था‎ करण्यात आलेली आहे. यावेळी‎ तालुका जिल्ह्यातील विषय तज्ञ‎ निमंत्रित शिक्षकांना संधी देण्यात‎ येणार आहे. या वर्गामध्ये‎ विद्यार्थ्याना अभ्यासिका, स्पेशल‎ नोट्स, दर्जेदार प्रकाशनाची पुस्तक‎ यांची व्यवस्था करण्यात आली‎ आहे. या बॅचचा यशस्वी प्रयोगानंतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जून पासून सहावी ते दहावीच्या‎ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा‎ घेऊन टॉप ४० मध्ये प्रवेश देण्याचा‎ संस्थेचा मानस आहे. या बॅचमध्ये‎ सहभागी होणारा विद्यार्थी‎ भविष्यामध्ये जेईई व नीट इत्यादी‎ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन डॉक्टर‎ व इंजिनिअर होण्याची क्षमता‎ विद्यार्थ्यांत निर्माण करण्याचा अाहे.‎ त्यासोबतच दहावी मराठी व सेमी‎ उन्हाळी वर्गाची सुरुवात करण्यात‎ आली असल्याचे मुख्याध्यापकांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...