आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर उपाय शोधा:कळंबमध्ये नळाद्वारे नागरिकांना दूषित पिवळ्या पाण्याचा पुरवठा; कोरोनाचे संकट कमी झाले, पण अस्वच्छ पाण्याचे संकट वाढले

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात नळाद्वारे पिवळे पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नगर परिषद प्रशासनाने नळाव्दारे शुध्द पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून उस्मानाबाद, बीड, लातूर या तीन जिल्ह्यांतील शहर व गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या धरणावर तीन जिल्ह्यांची मदार आहे. कळंब शहराला सुद्धा मांजरा प्रकल्पाचा एकमेव आधार आहे. मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळे मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या शहराचा व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

कळंब शहरापासून २३ किलोमीटर अंतरावर धनेगाव मांजरा प्रकल्प आहे. येथून शहराला पाणीपुरवठा होत आहे. शहराचा विस्तारात झपाट्याने होत आहे. कळंब शहराची ३० हजार, डिकसळ या गावची लोकसंख्या १५ असे एकूण ४५ हजार लोकसंख्या असून, दररोज ३० लाख लिटर पाणी लागते. कळंब व डिकसळ या गावाकरिता पाण्याचे सुयोग्य नियोजन करून रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो.

मांजरा प्रकल्पातून कॅनॉलव्दारे पाणी सोडल्यावर ते ढवळले जात असल्याने पाणी पिवळे होत आहे आणि हेच पाणी पाइपलाइनव्दारे डिकसळ येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे येत आहे व येथे प्रक्रिया करुन नळाव्दारे पाणी सोडण्यात येत आहे. परंतु या पाण्यामध्ये जास्त औषधीचा वापर केल्यावर शरीरावर विपरीत परिणाम होऊन नागरिक आजारी पडण्याची शक्यता असल्यामुळे पाण्यामध्ये जास्त प्रमाणात औषधी न टाकता नळाव्दारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी पिवळे दिसत असल्याचे नगर परिषद प्रशासना कडून सांगण्यात येत आहे.

आठवड्यातून दोन वेळा पिवळे पाणी
नगर परिषद प्रशासन कळंब शहरात आठवड्यातून दोन वेळा नळाव्दारे पाणी पुरवठा करत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून नळाला पिवळा पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे. अशा पाण्यामुुळे जर शहराला सामूहिक आजार झाले तर आरोग्य यंत्रणा तरी सक्षम आहे का?

बातम्या आणखी आहेत...