आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्तीचे काम सुरु:शहरात पुरवठा सुरळीत, बुधवारी सर्वांनाच पाणी

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उजनी येथील उपसा पंपाचे दोन संच बंद पडण्यासह अन्य ठिकाणी विद्युत स्टार्टरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे उस्मानाबादेत पाच दिवसांपासून पाणी नव्हते. मात्र, नगरपरिषदेने काम करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. शहरात पाच दिवसांपासून पाणी मिळत असल्याने अनेकांना अडचणी आल्या होत्या. दुसरीकडे दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे सोमवारी शहरातील काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मंगळवारी शहरातील उर्वरित भागाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या पूर्ण शहरात पाणी पोहचेल. तसेच त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी सांगितले. त्याचबरोबर आता शहरात तब्बल १६ एमएलडी पाणी मिळत असल्याने शहरात मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...