आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जागर संविधानाचा मध्ये सुराणा यांचे लोकशाही मूल्यांवर विवेचन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक संचालित धाराशिव प्रशालेच्या सभागृहात सोमवारी आयोजित ‘जागर संविधानाचा’ याविषयी ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी मार्गदर्शन केले. पन्नालाल सुराणा यांनी संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, गणराज्य आदींबाबत प्रबोधन केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अनेक प्रसंग सांगितले. कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलिप गणेश होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल लतिफ, अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड, सिद्धेश्वर बेलुरे, अंनिसचे शहराध्यक्ष, ‘आपलं घर’चे व्यवस्थापक विलास वकील, स्वामी गृहमाता प्रशालेच्या मुख्याध्यापिका धर्मे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे माडेकर उपस्थित होते. अॅड. अजय वाघाळे यांनी प्रास्ताविकात ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक इसाके, कुदळे, माळी, सुरवसे उपस्थित होते. जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...