आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:‘महाआरोग्य’त शस्त्रक्रियाही होणार ; सर्व आजारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार

उस्मानाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून परंडा येथे २७ नोव्हेंबरला महाआरोग्य शिबिर होणार असून यात तपासणीसह आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिरात सर्व आजारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कॅन्सर, डोळ्यांची तपासणी, रक्तक्षय, हृदयरोग, कान-नाक-घसा तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, इसीजी, सिकलसेल तपासणी, दंत, रक्तगट तपासणी करण्यासह औषधी वितरण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर महाआरोग्य शिबिरात तपासणी नंतर औषधी, वैद्यकीय साहित्य (चष्मे इ.) तसेच आवश्यक त्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया सुध्दा पूर्णतः मोफत केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...