आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या विधिमंडळात गाजलेली दुरावस्था झालेली बस मार्गस्थ केल्याचा ठपका ठेवून आगारातील निलंबित केलेल्या तिन्ही वाहन परीक्षकांचे निलंबन चार दिवसानंतर आगारप्रमुखांनी मागे घेतले. निलंबनानंतर विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘रोग हल्याला, इंजेक्शन मात्र पखालीला''अशी टीका केली होती. भूम आगारातील (एमएच २० बीएल ०२०६) या क्रमांकाच्या बसची अवस्था अतिशय वाईट होती. ही एसटी प्रवासी वाहतुकीसाठी मार्गस्थ असताना या बसचे फोटो व्हायरल झाले होते. बसवर लावलेल्या दमदार जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते.
यामुळे विरोधी पक्षनेते अजि त पवार यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी विधिमंडळात त्यावरील शासनाच्या दमदार जाहिरातीचा मुद्दा मांडत शासनावर सडकून टीका केली होती. सर्व प्रकारानंतर आगारप्रमुखांनी गुरुवारी वाहन परीक्षक डी. बी. एडके, एस. एन. हराळ व ए. यु. शेख यांना निलंबित केले. याची बातमी दैनिक ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात पवार यांनी निलंबन म्हणजे ‘रोग हल्याला इंजेक्शन मात्र पखालीला'' असा टोला लगावला. यानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांचे निलंबन सोमवारी (दि. ६) मागे घेतले. तसे पत्र तिन्ही वाहन परीक्षकांना आगार प्रमुख विनोद अलकुंठे यांनी दिले असून कर्मचारी कामावर हजर झाल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.