आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यानमाला‎:जवाहर महाविद्यालयात स्वामी‎ रामानंद तीर्थ व्याख्यानमाला‎

अणदूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जवाहर महाविद्यालयात इतिहास‎ विभाग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठ, औरंगाबाद विद्यार्थी विकास मंडळ यांच्या‎ संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे‎ तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. या‎ व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवार दि.८ रोजी प्रमुख‎ वक्ते प्रा.अमृत महाजन योगेश्वरी नूतन‎ विद्यालय,अंबाजोगाई यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ‎ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात‎ आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी तर‎ सरपंच रामचंद्र आलुरे,मारुती खोबरे गुरुजी, डॉक्टर‎ अशोक चिंचोले, प्रा.सुभाष स्वामी,श्रीमंत मुळे गुरुजी‎ व उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ यांचे‎ जीवन व कार्य या विषयावर पहिले पुष्प गुंफताना‎ अमृत महाजन यांनी रामानंद तीर्थ यांचे व्यक्तीमत्व व‎ त्यांचे कार्य याची महती सांगितली.‎

बातम्या आणखी आहेत...