आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार मंचतर्फे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार आणि हिंदू संघटन' या विषयावर पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रवी नरहिरे हे होते. तर माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ, जनकल्याण अर्बन को-आॅप. बँकेचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, सावरकर विचार मंचचे मकरंद पाटील, हमीद पठाण, शिवाजीराव गिड्डे, मनोज चोंदे, पांडुरंग पवार, परशुराम देशमाने यावेळी उपस्थित होते.
अभिनेते शरद पोंक्षे पुढे बोलताना म्हणाले की, हिमालयापासून सिंधू सागरापर्यंत जी जमीन आहे, (महाद्वीप) तिथे राहणारा प्रत्येक मानव हिंदू अशी सावरकरांनी 'हिंदू'धर्माची केलेली व्याख्या आहे. ही त्यांनी साध्या सरळ भाषेत सांगितली. माणुसकी हा खरा धर्म आहे, ही खरी जात आहे. त्यांनी जगात कुठल्याही हिंदूने प्रार्थनास्थळ पाडून तिथे मंदिर बांधल्याचे उदाहरण सापडणार नाही, असे विषद केले. जात ही जन्मावर नव्हे तर कर्मावर अवलंबून असावी' असे विचार शरद पोंक्षे यांनी मांडले. प्रास्तविक मकरंद पाटील यांनी व सूत्रसंचलन अर्चना बाविकर यांनी केले. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. प्रशांत जोशी, डॉ. शरद दशरथ, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. मीरा दशरथ, आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.