आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनाचे जादा बिल घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा; भूकंप पुनर्वसनाचा अनुभव वापरण्याचे आवाहन

उस्मानाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाजगी रुग्णालयांनी या कालावधीत जादा बिले आकारली असतील त्यांची माहिती घेऊन नियमबाह्य बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, जिल्हास्तरावर एकल महिला समिती स्थापन करून विविध शासकीय महामंडळे, माविम, उमेद, महिलांविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांची मदत घेऊन महिलांचे सक्षमीकरण करावे, असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

पुणे येथे झालेल्या आढावा बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या ग्रामीण भागातील विविध यात्रा उत्सवामध्ये सामान्य नागरिकांसाठी लसीकरणाची शिबिरे, कोरोना महिलांना शासकीय कागदपत्रे प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी समाधान शिबिर, छोट्या व्यावसायिकांना सहजपणे करता येतील असे व्यवसाय करण्यासाठीची मदत देण्यात यावी. जिल्ह्यातील शिक्षकांनी उभारलेला निधी शासकीय रुग्णालयांमध्ये सामूहिक सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्याबाबत नियोजन करावे. नागरी भागात घनकचरा व्यवस्थापनाचे विविध प्रयोग शहरी भागांमध्ये प्राधान्याने करण्यात यावे. एकल महिलांना मिळणारे शासकीय अनुदान बाबतची यादी शासकीय कार्यालयांमध्ये सर्वांच्या माहितीसाठी लावण्यात यावी.

त्याचबरोबर हे अनुदान या महिलांना थेट त्यांच्या खात्यात मिळावे यासाठी काम करावे. ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्या नावे त्यांच्या पतीच्या जमिनी आणि मालमत्ता हस्तांतरण करणेबाबत मार्गदर्शन शिबिरे आणि लोकअदालतीत सारखे पर्याय निवडून निवडावेत.अशाही सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, डॉ. सुनील पसरटे, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, एम. डी. तिर्थकर, गजानन नेरपगार आदी उपस्थित होते.

१०२ रुग्णवाहिकांसाठी चालक नेमा
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असलेल्या १०२ रुग्णवाहिकांना चालक नेमण्याबाबतच्या जिल्ह्याने दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपसभापती गोऱ्हे यांना केली. दिवेगावकर यांनी सर्व विषयांचे अहवाल तयार करून सादर करण्यात येतील, असे सांगितले.

भूकंप पुनर्वसनाचा अनुभव
जिल्ह्याला यापूर्वीचा भूकंप पुनर्वसन कार्याचा मोठा अनुभव पाठीशी आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना कालावधीमध्ये विविध समाज घटक व वैधव्य आलेल्या महिलांच्या विकासासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांवर आधारित प्रकल्प तयार करावा. एकल शेतकरी विधवा महिलांना बियाणे खते देण्याचे आवाहन आहे.

बातम्या आणखी आहेत...