आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आपले आरोग्य हे आपल्या हाती, तेव्हा खबरदारी घ्या; केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे आवाहन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या वतीने गुरूवारी जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित एड्स जनजागृती भव्य प्रभात फेरीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.यावेळी बाेलताना त्या म्हणाल्या,आपले आरोग्य आपल्या हाती असून, त्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कार्यक्रमासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राहुल गुप्ता, शिवाजी शिंदे,प्रभारी अधिष्ठाता डॉ. उज्वला गवळी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे-पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. तानाजी लाकाळ, डॉ.कुलदीप मिटकरी,डॉ.सचिन देशमुख,अमोल गरड आदी उपस्थित होते.यावेळी डॉ.पवार यांनी युवकांना जागतिक एड्स दिनाचे ब्रीदवाक्य आपली एकता आपली समानता एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या करिता, याबाबत मार्गदर्शन केले तसेच आयएमए महिला डॉक्टर विंग यांच्यावतीने स्वाक्षरी अभियानचे यावर्षीचे घोषवाक्य लिहून कटिबद्धता स्वाक्षरी अभियान मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. प्रभात फेरीची सांगता तुळजाभवानी स्टेडियम येथे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी भारुड सादर केले. प्रभात फेरीमध्ये शहरातील जिल्हा शासकीय नर्सिंग कॉलेज,आर पी कॉलेज, के टी पाटील कॉलेज फार्मसी आणि के.टी पाटील कॉलेज नर्सिंग, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, बिल गेट्स नर्सिंग कॉलेज, तेरणा महाविद्यालय, काजी नर्सिंग कॉलेज, घोगरे नर्सिंग कॉलेज, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथील मुलांनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...