आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायरान जमीन:शेतीसाठी अतिक्रमणाच्या नोंदी घ्या ; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन  देण्यात आले

कळंब11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय गायरान जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमणाची तपासणी करून तलाठी व मंडळ पंचनामा करून नोंदी घेण्याच्या मागणीसाठी लाल पँथर व श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने निदर्शने करुन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबादेत गावातील शासकीय पड गायरान जमीन क्षेत्रावर १९८९ पूर्वीपासून अतिक्रमण करून यावर्षीही शेतीसाठी वहित केली आहे. पिकांची लागवड केली. गायरान जमीन व वनजमिनी वहितीखाली आणल्या. याकडे मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी दुर्लक्ष करुन नियमांचे उल्लंघन केले. जिल्हाधिकारी, तहसीलदार व आपणास हे निदर्शनास आणून दिले.

जमीन महसुल संहिता १९६६ मधील (महाराष्ट्र जमीन महसूल नियम) महाराष्ट्र जमीन महसूल मंडळ अधिकारी व मंडळ निरीक्षक कर्तव्ये व कामे नियम १९७० मधील नियम १६ व १७ व महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ मधील कलम ५०,५३,५४ प्रमाणे कार्यवाही करीत नाहीत. त्यामुळे निदर्शने करण्यात आली. जय भीम संविधान रॅली काढुन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर लाल पँथरचे संस्थापक अध्यक्ष बजरंग ताटे, जिल्हाध्यक्ष माया शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...