आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचा वाढता विस्तार व मुलभूत सुविधांचा विचार करुन तब्बल २० वर्षांनंतर शहराचा सुधारीत आराखडा तयार करण्यात आला आहे. हा विकास आराखडा मजुरीकरिता नगररचनाकारांकडे सादर करण्यात आला आहे. विकास आराखडा म्हणजे शहराच्या विकासाची दिशा निश्चित करणारी कुंडली आहे. कळंब शहराची विकास योजना सुधारीत करण्यासाठी आवश्यक सार्वजनिक सोयी-सुविधांचे आरक्षण प्रस्तावित करण्यासाठी ६ सप्टेंबर २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती. याप्रसंगी शहर विकासाचा सुधारीत आराखडा व नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला.
यावर नागरिकांच्या सूचना, हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र एकही आक्षेप आला नव्हता, आक्षेपांचा कालावधी संपल्यामुळे हा विकास आराखडा वरिष्ठ स्तरावर मंजुरीकरिता पाठवण्यात आला आहे. आराखड्यावर एकही आक्षेप नाही शहर विकासाचा सुधारीत आराखडा व नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. यावर नागरिकांच्या सूचना, हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र एकही आक्षेप आला नव्हता, आक्षेपांचा कालावधी संपल्यामुळे हा विकास आराखडा वरिष्ठ स्तरावर मंजुरीकरिता पाठवण्यात आला आहे.
‘त्या’ जागेवर उपजिल्हा रुग्णालय..
उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजुने स्विमिंग पुलाचे आरक्षण होते. ती जागा उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराकरिता मिळावी म्हणून पालिकेतील मागील सत्ताधाऱ्यांनी ठराव मांडला होता. तो ठराव मंत्रालय स्तरावर पाठवण्यात आला होता. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. सुधारीत आराखड्यात त्या जागी उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराची तरतूद केली आहे.
बोट क्लब, मनोरंजन केंद्राची तरतूद
कळंब शहरालगत मांजरा नदीचे पात्र आहे. त्यामुळे मांजरा नदीला विशेष महत्त्व आहे. या गोष्टीचा विचार करुन विकास, बोट क्लब व मनोरंजन केंद्राची तरतूद या विकास आराखड्यात करण्यात आली आहे. भविष्यात घाट विकसीत झाल्यावर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
इमारतींसह मोकळ्या जागा, ग्रीन झोनचीही निश्चिती
शहराचा सुधारीत विकास आराखडा हा पुढील २० वर्षांसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात अस्तित्वात असलेले रस्ते, मोकळ्या जागा, ग्रीन झोन, इमारती आदींची निश्चिती करुन शहराचा नवीन नकाशा तयार करण्यात आला आहे.
यामध्ये कत्तलखाना, मटन बाजार, प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान, गोरगरिबांना घरे, उद्यान, दुकान केंद्र व वाहन स्थळ, क्रीडांगण यासारखी मूलभूत गरजेची आरक्षणे व अत्यावश्यक स्वरूपाच्या सार्वजनिक सुविधांची मर्यादित आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. यामुळे विकासाला चालणार मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.