आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाँडद्वारे वाटणी:तलाठी, मंडळाधिकाऱ्यांच्या कृपेने न्यायप्रविष्ट शेतीचा परस्पर फेरफार

वाळूज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाणेगावच्या वडिलोपार्जित शेतीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित

गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथील वडिलोपार्जित शेतजमिनीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच यापूर्वी औरंगाबाद खंडपीठ न्यायालयाच्या १२ जानेवारी २००८ रोजीच्या निर्णयानुसार जमिनीचा फेर अर्जदार रेखाबाई अंकुश घोडके, लक्ष्मीबाई खंडू औटे यांच्या नावावर करण्याचे आदेश आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत घाणेगावातील गट नं. १२५ मधील शेतजमीन विश्वनाथ खंडू औटे व ज्ञानेश्वर विश्वनाथ औटे यांनी १०० रुपये बाँड पेपरच्या आधारे वाटणी वारसापत्रानुसार रामेश्वर औटे व त्र्यंबकेश्वर औटे यांच्या नावावर फेर घेतला आहे. मुळात हा फेर खोटा असून सदरील न्यायालयाच्या आदेशकडे दुर्लक्ष करत चुकीचा व दिशाभूल करणारा फेर घेणाऱ्या तलाठी संदीप नामदेव पवार व मंडळाधिकारी संदीप रंगनाथ वाडीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रेखाबाई घोडके, लक्ष्मीबाई औट यांनी उपविभागीय कार्यालय वैजापूर व गंगापूर तहसील कार्यालयाकडे लेखी केली आहे.

आदेशाकडे दुर्लक्ष का केले?
सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट, तसेच, लेखी अर्ज देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने फेर घेऊन पदाचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे तलाठी व मंडळाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा उपोषणाला बसणार आहोत.
-रेखाबई घोडके, तक्रारदार

याबाबत मला माहिती नव्हती
या प्रकरणात संबंधितांनी अर्ज केल्याची मला माहिती नव्हती, मी दोन वर्षांपूर्वीच नियुक्त झालो आहे. फेर झाला असला तरी तो उपविभागीय कार्यालयात अर्ज करून रद्द करता येईल.
-संदीप पवार, घाणेगाव, तलाठी

दस्तऐवज दाखवावेत
संबंधितांनी तलाठी, मंडळाधिकाऱ्यांकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत दाखवावी, मगच यासंदर्भात बोलता येईल. फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलूयात.
- संदीप वाडीकर, तत्कालीन मंडळाधिकारी

बातम्या आणखी आहेत...