आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा आयोजित:परंडा येथे तालुकास्तरीय खो-खो मुलींच्या स्पर्धा

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येथे तालुकास्तरीय शालेय खो-खो मुलींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रथम राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी अशोक खुळे, ए.पी.आय. राजकुमार ससाणे, विस्तार अधिकारी संगमनेरकर, संस्थेच्या सचिव आशा मोरजकर जगताप, क्रीडा संयोजक सचिन पाटील, महेश शिंदे, जोतिराम गिरवले, इतेश गोरे, शिंगाडे, दिपक ओव्हाळ, डॉ. सुभाष मारकड, भगीरथ गोडगे, शाहीन हन्नुरे, रामेश्वर चोबे, एस.बी. करंडे, बी.बी. शिंदे, पी.पी.साबळे, एच.आर.पवार, व्ही.आर खुरंगे, ए.ए.पैठणपगार, एस.जी.शिंदे उपस्थित होते.

स्पर्धेसाठी तालुक्यातील १५ शाळांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये १४ वयोगटात- माणिक बाबा माध्यमिक शाळा शेळगाव, १७ वयोगटात- जय हनुमान माध्य व उच्च माध्य वाटेफळ, व १९ वयोगटात- ग्लोबल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पिंपरखेडच्या मुलींच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजयी संघाचे क्रिडा संयोजक व क्रडा शिक्षक तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. ग्लोबल शाळेने चांगल्या प्रकारचे खेळाचे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दलही क्रीडा संयोजक व क्रीडा शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...