आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची लाट 15 मेपर्यंत संपणार असल्याचा दावा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलाय. राज्यात कालपर्यंत कोरोनाचे 1100 रुग्ण होते. हा आकडा आता 460 च्या जवळ आला असल्याचेही सावंत म्हणाले.
लाट संपणार असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केली. धाराशिवमध्ये ते बोलत होते.
लाट 15 मेपर्यंत संपणार
hp1v6 ही कोरोनाची लाट ओसरत असून टास्क फोर्सच्या माहितीनुसार ही लाट 15 तारखेपर्यंत संपुष्टात येईल असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. त्याचबरोबर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचेही ते म्हणाले.सध्याच्या कोरोनाचा लाटेचा धोका कमी तरी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
राज्यात कोरोना रुग्णामध्ये 15 टक्के घट
राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या राज्यात 5 हजार 233 रुग्ण बाधित आहेत.
मुंबईत जेष्ठांना नाकावाटे लस
मुंबई महापालिकेतर्फे जेष्ठ नागरिकांना विनामुल्य लस देण्यात येत आहे. पालिकेच्या निवडक वॉर्डांमध्ये भारत बायोटेकची इन्कोव्हॅक ही नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध असणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.