आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेचा लाभ:जिल्ह्यासाठी 390 शेततळ्यांचे उद्दिष्ट, 75 हजारांपर्यंत अनुदान

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनांमधून जिल्ह्यासाठी ३९० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक तळ्याच्या आकारमान नुसार १४ हजार ४३३ ते ७५ हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान ००.६० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिक दृष्टया योग्य असावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वी शासकिय योजनेतून शेततळ्याचे लाभ घेतला नाही, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा ७/१२ व आठ अ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमी पत्र, जातीचा दाखला आवश्यक लागणार आहे. यासाठी इच्छुक लाभार्थींनी महाडीबीटी पोर्ट वरती (https://mahadbtmahit.gov.in) या संकेतस्थळावर वैयक्तीक शेततळे या घटकांसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...