आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीककर्ज वाटप:उद्दिष्ट 144 कोटींचे; 4 हजार 230 शेतकऱ्यांना 17 कोटींचे पीककर्ज वाटप

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १७ हजार ५७६ शेतकरी सभासदांना खरीप व रब्बी हंगामासाठी १४४ कोटी ८६ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी १०४ कोटी ३२ लाख रुपये वाटप करण्यात येणार असून त्यापैकी ४ हजार २३० शेतकऱ्यांना १७ कोटी ९३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेत पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ करिता पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यानुसार तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडीया, आयसीआयसीआय बँक आदी शाखांचे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ५६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सभासद शेतकरी असे एकूण १७ हजार ५७६ खातेदारांना खरीप व रब्बी हंगामासाठी १४४ कोटी ८६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे वार्षिक उद्दिष्ट आहे.

त्यापैकी २०२२-२३ या वर्षातील खरीप हंगामासाठी १०४ कोटी ३२ लाख व रब्बी हंगामासाठी ४० कोटी ५४ लाख पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. शुक्रवारी (दि.१३) बँकेच्या झालेल्या आढावा बैठकीत मागील आर्थिक वर्षाच्या पीक कर्ज वाटपाचा व २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पीक कर्ज वाटपाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. मागील आर्थिक वर्षातील पीक कर्ज वाटपाचे ७४.४३ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण झाले होते. खरीप हंगाम २०२२-२३ करिता एप्रिल २०२२ अखेर ४२३० शेतकऱ्यांना १७ कोटी ९३ लाख रुपये पीक कर्ज वाटप झाले आहे.

सदर पीक कर्ज वाटपाचा वेग व प्रमाण कमी असल्याबाबत संबंधीत बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पीक कर्ज वाटप सर्व बँकांनी सुरू केले आहे. मात्र, सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी व नूतनीकरणासाठी अर्ज प्राप्त होत नसून याबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...