आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला (खुर्द) (ता. तुळजापूर) येथील उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब चिवडे यांच्या ‘माझा वाढदिवस-शाळेस पुस्तक भेट’ या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. त्याबद्दल त्यांना सर फाउंडेशन टिचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२२ सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे प्रदान करण्यात आला. स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आली होती. प्राप्त नवोपक्रमांमधून चिवडे यांची निवड झाली होती.
सोलापुरात दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशनल नॅशनल कॉन्फरन्समध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यात समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, बालाजी अमाइन्सचे एमडी राम रेड्डी, जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. ह. ना. जगताप, साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य शेखर गायकवाड, प्रशासन अधिकारी डॉ. दीपक माळी, प्राध्यापक डॉ. किरण धांडे, माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे, ख्यातनाम प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय वारे, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या यशाबद्दल विस्तार अधिकारी दैवशाला शिंदे, केंद्रप्रमुख ऋषी भोसले, मुख्याध्यापक मारुती घंदुरे सर्व शिक्षक, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.