आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धास्थान:शिक्षक दिन अनेक ठिकाणी उत्साहात ; महाविद्यालयांमध्ये राधाकृष्णन यांना अभिवादन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. उमरगा शहरातील भारत विद्यालयात शिक्षक दिन सोमवारी साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम दहावीतील विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते. प्रारंभी भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक तात्याराव मोरे यांचा पुतळा व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन सहशिक्षक व्यंकट गुंजोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत विद्यालयाचे पर्यवेक्षक विक्रांत मोरे उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक लक्ष्मण माने, मुख्याध्यापक शाहूराज जाधव, संजय देशमुख यांच्या उपस्थित शिक्षक दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण करून सहभाग नोंदवले तसेच गीत गायले व शिक्षकांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. साक्षी बिराजदार हिने सूत्रसंचलन केले. सुमित्रा माने हिने आभार मानले.

तलमोड विद्यालय तलमोड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक जयवंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला करबस माळी, जितेंद्र जाधव, महेश सूर्यवंशी, नितीन राठोड, अश्विनी बिराजदार, ललिता पवार उपस्थित होते. समीक्षा सास्तुरे हिने सूत्रसंचालन केले. अस्मिता घोटाळे हिने आभार मानले. तुकाई गणेश मंडळाच्या वतीने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, फेटा व पेढा देवून सत्कार करत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एकुरगा विद्यालय तालुक्यात एकुरगा येथील शिवशक्ती विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रतापराव औरादे उपस्थित होते. संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापक प्रकाश बोंडके यांचा औरादे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अभिषेक जवळगे, भाग्यश्री गायकवाड, शिवानी शिरसे,पद्मिनी बिराजदार अन औरादे यांचे भाषण झाली. यावेळी विजयाताई गायकवाड, राजेंद्र सगर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथील शरामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.याप्रसंगी सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रंथालय व माहिती शास्त्र महाविद्यालय ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय उस्मानाबाद येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. गायकवाड सर हे होते. अध्यक्ष भाषणात डॉ.कांबळे यांनी शिष्य व गुरू कसा असावा याबाबत मिलिंद व नागसेन यांचे उदाहरण दिले. सूत्रसंचालन प्रा. गायकवाड यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...