आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धांचे आयोजन:शिक्षकांचा सत्कार, एसपींच्या हस्ते महाआरती

नळदुर्ग20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनानिमित्त येथील पोलिस ठाण्याच्या जयहिंद गणेश मंडळाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सायंकाळी सात वाजता पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते जयहिंद गणेश मंडळाच्या गणरायाची महाआरती करण्यात आली.नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांसाठी स्पर्धा तसेच महिलांसाठी गौरी आरास देखावा स्पर्धेचे आयोजन केले आहे. पोलिस ठाण्याच्या वतीने अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त जयहिंद गणेश मंडळाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी शिक्षकांचा सत्कार करून गौरव केला.

यावेळी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रामदास ढोकळे, प्रा. समाधान शेठमारे, जि. प. प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष जाधवर, शिक्षिका तस्मिन सय्यद, शिक्षक भैरवनाथ कानडे, धरित्री विद्यालयाचे शिक्षक माणिक कोकणे, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे नागेश कर्पे व प्रविण गंगणे यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी सात वाजता पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते जयहिंद गणेश मंडळाच्या श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. प्रारंभी सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, सरदारसिंग ठाकूर, शाम कनकधर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...