आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात शाळा सुरू झाल्याने पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतले आहेत. तर वाडी, वस्ती, तांड्यावरती भटकत शिक्षक विद्यार्थी आपल्या शाळांकडे आकर्षित करण्याच्या कामाला लागले असून प्रवेशासाठी पालकांना विविध प्रलोभने दिली जात असल्याचे एक चित्र गावागावातून दिसून येत आहे.
काही शाळेतील शिक्षकांनी आपले उद्दिष्ट साध्य केले असले तरी लहान शाळांत अद्यापही प्रवेश होण्यासाठी विद्यार्थ्यांची वाणवाच दिसत आहे. उत्पन्न कमी असलेल्या पालकांचा गटही आता कॉन्व्हेंट संस्कृतीचे कडे मोठ्या प्रमाणात वळत असल्यामुळे मराठीच्या शाळा ओस पडत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत चालली असल्याने मराठी शाळांचे पुढील भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्य संस्थांच्या शिक्षकांचा प्रवेशासाठी तगादा वाढत आहे.
परिणामी ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी संख्या खालावत असल्याचे वास्तव आहे. खासगी शाळांनाही पुरेशी विद्यार्थी संख्या मिळत नसल्याने नामवंत नसलेल्या शाळातील वर्ग तुटत असून अतिरिक्त शिक्षक या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
जि. प. शाळांत सुविधा नाही
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तज्ञ शिक्षकांची कमतरता, इमारत व संसांधनांची कमी,उपलब्ध शिक्षकावर अध्यापनासोबत अन्य कामाचा ताणामुळे विद्यार्थ्यी गळती होत आहे. त्यामुळे अधिकाधिक जिल्हा परिषदेच्या शाळा समस्येच्या गर्तेत सापडल्या आहेत.खासगी शिक्षण संस्थांचे तत्परता आणि गतिशील नियोजन यामुळे मोठ्या प्रमाणावर पालक आणि विद्यार्थी त्या शाळांकडे वळत आहेत.
खासगी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना दिले प्रवेश टार्गेट तालुक्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच खासगी संस्थांच्या प्राथमिक,माध्यमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली आहे. यासाठी खासगी शाळांचे शिक्षक वेगवेगळे गट तयार करून विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेला गती दिली आहे. संस्थेने विद्यार्थ्यी प्रवेशाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मोफत, घर ते शाळा व शाळा ते घरापर्यंत येण्या-जाण्यासाठी मोफत सेवा सोबतच आकर्षक प्रलोभने विद्यार्थ्यांच्या शोधात असलेल्या शिक्षकां कडून दिल्या जात आहेत. शिक्षकांच्या ऑफर स्वीकारून अनेक विद्यार्थी इकडल्या शाळेतून तिकडे जात असल्याचा प्रकारही पाहायला मिळत आहे.
यात आर्थिक दृष्टया सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांच्या नामवंत शाळेत प्रवेशासाठी मात्र रांगा लागत आहेत. अन्य शाळांना मात्र विद्यार्थ्यांसाठी वाडी वस्ती तांडावर वणवण फिरावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गणपूर्ती करण्यासाठी अनेक शिक्षक स्व-खर्चातून मुलांना प्रलोभन देत आहेत. मराठी शाळातील विद्यार्थी संख्या दर वर्षी कमी होत चालली आहे. या शाळा टिकविणे हे उद्दिष्ट संस्थांचे आहे. त्याचा अंतिम परिणाम हा शिक्षकांवर होणार आहे. नोकरी तेथेच टिकावी या अपेक्षेने शिक्षकांची विद्यार्थी शोध मोहीम सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.