आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थवाहिनी:पतसंस्था निवडणुकीत शिक्षक सेवा सहकार पॅनलची बाजी ; 11 जागा जिंकत विजयी घोषित

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी समजली जाणारी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक सेवा सहकार पॅनलने सर्व ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. बाजार समितीमध्ये पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर सायंकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत तीन पॅनल होते. त्यात धनाजी मुळे, डी. डी. कदम यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिक्षक सहकार पॅनलने सर्व ११ जागांवर पुन्हा एकदा विजय मिळवला. विरोधी स्वाभिमानी शिक्षक पॅनल व शिक्षक सन्मान पॅनलला खातेही उघडता आले नाही. विजयी पॅनलमधून प्रशांत मिटकर, सुनिल सूर्यवंशी, विठ्ठल गायकवाड, दयानंद जवळगावकर, प्रशांत गायकवाड, सत्येश्वर जाधव, अशोक राठोड, नागेश स्वामी, सोमनाथ निटुरे, रेखा गोरे, सुनिता गाढवे यांनी विजय मिळवला. निकालानंतर विजयी उमेदवारांनी कुंकू, गुलालाची उधळण करत शहरातून मिरवणूक काढली.

१०० मतांच्या फरकाने विजय
तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे एकुण ४६३ सभासद असून ४५० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयी उमेदवारांनी सर्व ११ जागांवर जवळपास १०० मतांच्या फरकाने विजय मिळवला. या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल दहा कोटींपर्यंत गेली असून कर्ज मर्यादा दोन लाखांवरुन दहा लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...