आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरवे नम::आईवडिलांचा सांभाळ करण्याचे संस्कार शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर करावे ; गांधी विद्यालयात कार्यक्रम

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांच्या अध्यापन कार्यातून किती विद्यार्थी घडले, किती विद्यार्थी आईवडिलांचा सांभाळ करत आहेत, किती विद्यार्थी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहेत. यावरूनच शिक्षकांचा दर्जा ठरत असतो. शिक्षकांना पुरस्कार दिले जातात पण जे विद्यार्थी शिक्षकांना मरेपर्यंत गुरू मानतात तेच खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असतात असे मत उपप्राचार्य बी.एस. जाधव यांनी व्यक्त केले.

तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीचे निमित्ताने सोमवारी (५) आयोजित शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात उपप्राचार्य जाधव बोलत होते. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्तम अध्यापन कार्य करणारे शिक्षक सुरेंद्र ओहोळ संजय शिंदे, सुनंदा अहिरे, वसंत राठोड, पांडूरंग कोळी, वाजीद शेख, सचिन मठपती यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून शिक्षकांप्रती गौरवोद्गार काढले. प्राचार्य एन. एम. माने अध्यक्षस्थानी होते. यावेळी पर्यवेक्षिका एस. एम. आहिरे, अभिजित जाधव, एच. व्ही. पवार, टी. एस. माणिकवार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य माने म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेत मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कमतरताच आहे. शिक्षक आधुनिक काळानुसार आपल्या मध्ये सकारात्मक बदल घडवून घेऊन अध्यापनात नावीन्य आणतात तेच शिक्षक हे प्रभावी शिक्षक बनतात असे मत व्यक्त केले. सहशिक्षक शरद पुजारी यांनी सूत्रसंचलन केले. डॉ गजेंद्र मुगळे यांनी आभार मानले.

महात्मा गांधी विद्यालय
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या शिक्षण प्रणालीत शिक्षक म्हणून आपली भूमिका काय आहे हे ओळखणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. बी. व्ही. सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. जी. व्ही. पवार यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक डी. एस. सरवदे, आर. एम. महिंद्रकर, ए. जी. जाधव, बी. एस. तेलंग, डी. पी. पवार, एस. एम. मोरे, एस. एस. भंडारी, एच. जी. सगरे, व्ही आर. वडतीले, बी. एम. सुर्यवंशी यांच्यासह विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. जकेकूरवाडी जि.प. शाळेत यावेळी मुलांना खाऊचे वाटप करून पेन भेट देण्यात आले. यावेळी रघुवीर आरणे, मल्लिकार्जुन कोळी, अमिता वाघवसे, प्रमोद मोरे, बालाजी कदम, प्रमोद साखरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

जकेकूरवाडी जि. प.शाळा
जकेकूरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी नारळाच्या झाडाचे रोप देवून शिक्षकांचा सत्कार करून मनोगत व्यक्त केले. यावेळी केक कापून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शुभेच्छा कार्ड व पुष्प देवून शिक्षकांचा गौरव केला.

बातम्या आणखी आहेत...