आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांप्रती कृतज्ञता:शिक्षक-विद्यार्थ्यांनी काळाप्रमाणे बदलावे, मुख्याध्यापकांचे  आवाहन

मोहा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहा येथील ज्ञान प्रसार विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नाजिया सय्यद या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक संजय जगताप म्हणाले की शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल करायला शिकले पाहिजे.पर्यावरणाची व आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.तरच याचा लाभ पुढच्या पिढीला होणार आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सतिश मडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोहित मोहेकर यांनी केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...