आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैधरित्या, विना परवाना दोन ते अडीच लाखाच्या सागवान लाकडाचा साठा उमरगा वनपरिक्षेत्राचे विभागाने जप्त केला. संबधितावर दंडात्मक कारवाई केली. तालुक्यातील तुरोरी येथील राजेसाब शेख यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परवानगी शिवाय नऊ घनमीटर सागवान लागडाचा साठा मुळज विभाग वनपरिक्षेत्रील तुरोरीत केल्याचे आढळले. या प्रकरणी युवराज गुंडू माने, नामदेव जमादार पंचासमक्ष शनिवारी (दि.४) पंचनामा केला. वनपरिक्षेत्र अधिकारी राजू शिपे यांचे आदेशाने वनपाल मुक्ता गुट्टे, वनरक्षक नामदेव कोकाटे यांनी कारवाई केली.
प्रभाकर थोरात, निळकंठ रणछत्रे यांनी मदत केली. उमरगा तालुक्यात अवैधरित्या वृक्षतोड होऊ नये या करिता वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने कडक मोहीम हाती घेण्यात आल्याने अवैध आणि चोरीचे मार्गाने वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान तालुक्यात चंदनाच्या शकडो झाडांची कत्तल करून चंदनाची चोरी करण्यात आल्याच्या तक्रारी वन परिक्षेत्र विभागाला देऊनही याचा अद्याप शोध लागला नसल्याने संबंधित विभागाने चंदन चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.