आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:तंत्रस्नेही व पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक: उमेश खोसे

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर जिल्ह्यातील माटेफळ या गावचे मूळचे असलेले उमेश रघुनाथ खोसे हे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर येथे कार्यरत आहेत. उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार एकाच वर्षी मिळाले आहेत..

उमेश खोसे हे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत जि. प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब व सध्याची शाळा जगदंबानगर, कडदोरा या दोन शाळेत कार्य केले आहे. दोन्ही शाळेत विविध उपक्रम राबवून दोन्ही शाळाचा उपक्रमशील शाळा म्हणून गौरव झाला आहे. त्यांनी २००७ मध्ये सेवेचा प्रारंभ झाला असून एकूण १५ वर्षे सेवा झाली आहे. या सेवेच्या काळात सुरुवातीला त्यांनी लमाण तांडा बेळब या शाळेत कार्य केले. त्या शाळेत रुजू झाले त्यावेळेस त्या तांड्यात 5 वी पर्यंत शाळा होती. पटसंख्या ५० च्या आसपास होती. परंतु उपस्थितीचा प्रश्न होता. मुलींच्या शिक्षणाबद्दल अनास्था होती. कारण शाळेत येणारे सर्व मुले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बंजारा जमातीतील होती. जिथे लोक कामासाठी बाहेरगावी स्थलांतर करायचे. अशी परिस्थिती बदलण्यासाठी सहकाऱ्यांच्या मदतीने गावातील लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. कामासाठी बाहेरगावी जाताना आपली मुले आजी आजोबांकडे ठेवणे किंवा हंगामी वसतिगृह याची मदत घेऊन १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

. मुलांच्या सहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून त्यातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शाळेचे स्वतःचे संकेतस्थळ २०११ साली निर्मिती करून त्या माध्यमातून त्यांनी जे तयार केलेलं हे साहित्य आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांना उपयोगी पडावं विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी त्या संकेतस्थळावर ते साहित्य ठेवलं. २०१३ साली त्यांनी स्वतःच युट्युब चॅनेल सुरू करून त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वापरता यावेत यासाठी त्यावर उपलब्ध करून दिले. यामुळे बेळम तांडा या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग वर्ग वाढ होऊन इयत्ता पहिली ते सातवी शाळा झाली. तसेच विद्यार्थी संख्या पन्नासच्या आसपास होती ती आता शंभरच्या वर गेली आहे. शिक्षक संख्या दोन वरून आता १०० वर गेली आहे. पास झाली आहे. हे केवळ पटसंख्यातच वाढ नाही, तर गुणवत्तेत सुद्धा त्या शाळेमध्ये वाढ दिसून आली.

त्यांनी बंजारा बोली भाषेतून इयत्ता पहिलीचे पुस्तक अनुवादीत करून मुलांना त्यांच्या बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला, याचा नक्कीच फायदा तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि गुणवत्ता वाढीमध्ये झाला आहे. बोली भाषेतून शिक्षण मिळाल्याने मुले आनंददायी पद्धतीने शिकली. या उपक्रमाची राज्यातील शिक्षणाची वारी या उपक्रमांमध्ये निवड होऊन, जवळपास लाखो शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्या समोर सादरीकरणाची संधी त्यांना मिळाली. लोकवाटा जमा करून त्यांनी ती शाळा डिजिटल शाळा केली होती. अशा या उपक्रमशील शिक्षकाला देशाचा सर्वोच्च राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...