आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्यांचे निवारण:महावितरणच्या पाचुंदा उपकेंद्रातील दूरध्वनी दोन वर्षांपासून बंद ; मशीनही कोरोना काळापासून बंद

काक्रंबाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील १८ गावांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तुळजापूर लातुर महामार्गावरील पांचुदा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात नागरिकांच्या विजेच्या बाबतीत असलेल्या अडीअडचणी व समस्यांचे निवारण व आपतकालीन काळात वेळीच संदेश देण्यासाठी दुरध्वनी आहे. पण तब्बल गेली दोन वर्षापासून तो बंद ठेवण्यात आल्याने ऐनवेळी घडणाऱ्या घटनेची माहिती अथवा विजेची समस्या सांगायची कुणाला असा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

तुळजापूर नागपूर रत्नागिरी महामार्गावर कार्यरत असलेल्या महावितरणच्या पांचुदा येथील ३३ के.व्ही.उपकेंद्रातून तालुक्यातील काक्रंबा ,होनाळा,खंडाळा,वगाव लाख,होनाळा,कार्ला,मोर्डा,काक्रंबावाडी,जवळगा मे ,सिंदफळ,अमृतवाडी,शिराढोण,ढेकरी,आपसिंगा ,कामठा,कात्री,सांगवी,मसला आदी १८ गावांसह शेतीला या ठिकाणाहून वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र या उपकेंद्राच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गेली दोन वर्षापासून १८ गावातील सर्व सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याकडे महावितरणने उपकेंद्रात कामचुकार व निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर आळा घालण्यासाठी बसवण्यात आलेली बायोमॅट्रिक मशीनही गेली दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. याचा फायदा या ठिकाणी नियुक्त केलेले चार ऑपरेटर मंडळी घेतात. ते आपआपल्या सोयीनुसर काम करत असून ग्रामीण भागातील महावितरणचा कारभार चक्क झिरो वायरमनवर चालत आहे. उपकेंद्रात कार्यरत ऑपरेटरच्या मनमानीमुळे झिरो वायरमनच्या जीवावर बेतत असून काक्रंबा येथील दोघांना विजेचा शाॅक लागून कायमचे अपंगत्व आले आहे. या घटनेला महावितरण कंपनी की ऑपरेटर जबाबदार असा प्रश्न नागरिकांना मधून विचारला जात आहे .उपकेंद्रात कुठल्याच कार्डला रेंज येत नाही▪️ या बाबत पांचुदा उपकेंद्रातील ऑपरेटर आर.पी.शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की उपकेंद्रात कार्यरत असलेल्या दुरध्वनीमध्ये कुठलेही कार्ड टाकले तरीसुद्धा रेंज मिळत नसल्याने दुरध्वनी दोन वर्षापासून बंद असल्याचे अजब उत्तर दिले.

बायोमॅट्रिक मशीन धूळखात
या बाबत उपकेंद्राचे अभियंता शिरीष कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि पाचुंदा उपकेंद्राच्या ठिकाण लावण्यात आलेली बाॅयोमेट्रिक मशीन फक्त ऑपरेटर साठी लावण्यात आली असुन ती कोरोना काळापासून बंद आहे. या स्थितीत कर्मचाऱ्यांवर वचक कसा राहणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

बातम्या आणखी आहेत...