आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:मागील ठाकरे सरकारने जिल्ह्यात‎ कोणती विकास कामे केली सांगा; यापेक्षा मोदी सरकारचे‎ मन मोठे : नितीन काळे‎

‎उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ उस्मानाबाद-तुळजापूर- सोलापूर‎ ‎ रेल्वेसाठी केंद्र‎ ‎ सरकारने केंद्रीय‎ ‎ अर्थसंकल्पात‎ ‎ ११० कोटी रुपये‎ ‎ देण्याचा निर्णय व‎ ‎ राज्य सरकारचा‎ ४५२.५६ कोटींचा निर्णय खासदारांना‎ पैशाचा पाऊस अन् पहिलाच चेक‎ बाऊन्स आणि आमदारांना‎ लबाडाचे आवतन वाटत असेल तर‎ खासदार-आमदारांनी ठाकरे-पवार‎ सरकारच्या काळात जिल्ह्यात किती‎ आणि कोणती विकासकामे करून‎ पैशांचा पाऊस पाडला व कोणत्या‎ योजनांच्या जेवणावळी उठवल्या,‎ समाजातील कोणत्या लाभार्थी‎ वर्गाने तृप्तीची ढेकर दिली हे‎ जनतेला सांगावे, असा पलटवार‎ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष‎ नितीन काळे यांनी केला आहे.ठाकरे‎ सरकारपेक्षा मोदी यांचे मन कितीतरी‎ मोठे आहे, असेही काळे यांनी‎ म्हटले आहे.‎

नितीन काळे यांनी म्हटले अाहे‎ की, तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या‎ नकाशावर यावे, अशी मागणी १९६०‎ पासून सुरू आहे. २००४ साली‎ सोलापूर-तुळजापूर-उस् मानाबाद‎ रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी‎ मिळाली होती.२०१९ साली सोलापूर‎ भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या‎ रेल्वेमार्गासाठी सरकारने मंजुरी‎ दिली असल्याचे जाहीर केले.

मात्र‎ तत्कालीन राज्य सरकरच्या उदासिन‎ धोरणामुळे व निधी अभावी‎ भूसंपादन प्रक्रिया रेंगाळली होती.‎ ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल‎ परब यांनी तर ह्या रेल्वेमार्गाबाबत‎ वेगळीच माहिती सभागृहात‎ दिल्यामुळे आ.राणाजगजितसिंह‎ पाटील यांनी त्यांच्यावर हक्कभंगाची‎ सूचना दिली होती. अखेर‎ राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांच्या सरकारने ४५२.५६ कोटी‎ रुपयांचा सहभाग कॅबीनेटच्या‎ बैठकीत जाहीर केला.‎

बातम्या आणखी आहेत...