आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरांतर्गत फरक:हातलादेवी परिसरात 3 अंशाने तापमान कमी, शहरात 2-2 किमीवर बदल

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ १२ ते १२.४५ ची. ठिकाणे तीन. मात्र, तापमानाच्या नोंदी वेगवेगळ्या. शहरातील औरंगाबाद रोड लगतचा तेरणा महाविद्यालय परिसर प्रचंड उष्ण. या भागात ४३ अंशावर तापमान पोहोचलेले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात त्याचवेळी तापमान ४२ अंशावर होते. तुलनेने बार्शी रोडवरील हातलादेवी परिसरात तापमानाचा पारा कमी होता. येथे ४० अंश तापमान नोंदवले गेले. एकाच शहरात साधारण दोन किलोमीटर अंतरावर तापमान वेगवेगळे नोंदले गेले. शहराच्या तुलनेत हातलादेवी परिसरात तापमान ३ अंशाने कमी होते. हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते हा फरक केवळ वृक्षलागवडीमुळे दिसून येत आहे.

शहरातील प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर तापमानात फरक जाणवत आहे. “दिव्य मराठी’ने हा फरक दाखवितानाच त्याच्या कारणांनाचा शोध घेतला. तज्ञांनीही ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटापासून वाचण्यासाठी वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल साधण्याची गरज व्यक्त केली.“दिव्य मराठी’ने तापमान मोजल्यानंतर शहरातील ३ ठिकाणी वेगवेगळा फरक दिसला. तेरणा महाविद्यालय परिसरातील छत्रपती शाहू महाराज चौकात तापमानाचा सर्वाधिक बिंदू दिसून आला. दुपारी येथील तापमान ४३ अंशांवर होते. याचवेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात तापमान समान होते. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तापमान ४२ अंश सेल्सिअस होते. राजमाता जिजाऊ चौकातील तापमानही ४२ अंश इतकेच नांेदले गेले. मात्र, शहरालगत बार्शी रोडवरील हातलादेवी मंदिर परिसरातील तापमान ४० अंश सेल्सियस इतके नोंदले गेले. एकाचवेळी नोंदल्या गेलेल्या या तापमानामध्ये ३ अंशांचा स्पष्ट फरक दिसून आला.

1 तापमानाच्या बदलानुसार पावसाळ्यात पावसाचीही विसंगती दिसते. हातलादेवी परिसरात प्रचंड पाऊस पडतो. तुलनेने उस्मानाबाद शहरात हे प्रमाण कमी असते. या भागातील वनीकरण आणि डोंगररांगांमुळे ही विसंगती असू शकते, असे हवामानतज्ञ सांगतात.

2 उस्मानाबाद शहरातील आनंदनगर, समता नगर, तांबरी विभाग, नेहरू चौक आदी भागात संबंधित वृक्षप्रेमींच्या पुढाकारातून वृक्षलागवड वाढली आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भागात तापमानाच्या नोंदीमध्ये फरक दिसून येतो. मात्र,लागवड करताना पर्यावरणाला पूरक असलेल्या वृक्षांची निवड आवश्यक आहे.

3 वन विभागाच्या पुढाकारातून आता सर्वत्र घनवन (घनदाट पद्धतीने वृक्षलागवड) संकल्पना पुढे आली आहे. शहरात पालिकेने अनेक ओपन स्पेसमध्ये घनवन पद्धतीने वृक्षलागवड केली आहे. तसेच तुळजापूर रोडलगत वनविभागाने साडेनऊ एकरवर असे घनवन साकारले आहे.

बातम्या आणखी आहेत...