आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:14 ते 17 मे दरम्यान 4 अंशांनी घसरणार तापमान; बंगालच्या उपसागरातील वादळामुळे जिल्ह्यात निर्माण होणार ढगाळ वातावरण

उस्मानाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शुक्रवारचे (दि.६) तापमान ४२ अंशावर होता. तापमानामुळे त्रस्त जिल्हावासीयांना १४ पासून काहीसा दिलासा मिळणार आहे. १४ ते १७ मे दरम्यान जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी घटून ३८ ते ३७ अंशादरम्यान राहील. बंगालच्या उपसागरातील वादळांमुळे याची हवामान विभागाने वर्तवली आहे.

जिल्ह्यात तापमान २९ एप्रिल रोजी ४३.७ अंशांपर्यंत पोहोचले होते. मे महिन्याची सुरूवातही उष्णतेच्या लाटांनी झाली आहे. आताही तापमान ४१ ते ४२ अंशादरम्यान स्थिरावले आहे. मात्र, १४ ते १७ मे या चार दिवसांत जिल्ह्यात तापमानाचा पार कमी होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील वादळांमुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमान सरासरी ३ ते ४ अंशांनी घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या तापमानाबरोबरच रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.

यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यंदा पावसाळा समाधानकारक झाला असून बहुतांश प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे परिसरात थंडावा राहण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा भयानक उष्णतेमुळे प्रकल्पाजवळील गावांनाही उन्हाच्या तीव्रतेसह वातावरणातील उष्णता जाणवत आहे.

बातम्या आणखी आहेत...