आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनीचा मोबदला:संपादित जमिनीच्या मावेजासाठी दहा वर्षांपासून प्रतीक्षा

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग रस्ता चौपदरीकरणाच्या कामासाठी संपादित केलेल्या जमीनीचा मोबदला दहा वर्षे झाली तरी उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

रस्ता चौपदरीकरणात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळवून देण्यासाठी शनिवारी (३०) आष्टा मोड येथे श्री साई विठ्ठल मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमरगा व लोहारा विधानसभाअध्यक्ष शाहुराज माने यांनी शेतकऱ्यांना आवाहन करून संबंधित विभाग व कंत्राटदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी सोलापूर महामार्गाचे प्रकल्प अधिकारी, एसटीपीएल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अद्याप संपादित जमिनीचा मोबदला मिळालेला नसलेल्या शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यासमोर तक्रारीचा पाढाच वाचला. उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून ज्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या फाईल्सचा निपटारा येणाऱ्या दहा दिवसात भुसंपादन अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन तात्काळ निपटारा करून संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी मान्य केले.

दरम्यान माने यांनी रस्ता चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला येत्या दहा दिवसात मोबदला देण्याचे मान्य केले आहे. रस्त्यावरील खड्डे, वळण रस्ता आणि उड्डाणपुल व रस्ता क्रॉसिंग कामे दिलेल्या मुदत काळात पूर्ण करण्यात यावेत अन्यथा धडक आंदोलन केले जाईल असा इशारा संबंधित विभाग, कंपनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी एसटीपीएल कंपनीचे अनिल शर्मा, अनिल विपत, महेश उटगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीला दिलिपराव माने, भाजप लोहारा तालुकाध्यक्ष राजु पाटील, शिवशंकर हत्तरगे, यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...