आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरंडा तालुक्यातील डोंजा येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी शहराकडे कल वाढला आहे. यामुळे गावातील शाळेचे अस्तित्व धोक्यात आले असून सर्वसामान्य पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.डोंजा येथून तीन बसेसमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात जातात. शहरातील शाळांच्या शिक्षकांनी डोंजातील गाव, वाड्यांवर फिरून विद्यार्थ्यांची शोधमोहिम करून विद्यार्थी घेऊन गेले आहेत. त्यामुळे डोंजा भागातील सर्वच शाळा मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. डोंज्यातील पालकांचा आपल्या पाल्यांना शहरातील नामांकित असलेल्याच शाळांमध्ये दाखल करण्याकडे अधिक कल वाढला असल्यामुळे व कधी काळी नामवंत व गुणवान उच्चपदस्थ विद्यार्थी घडविणाऱ्या डोंजा गावातील शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यात सर्वात मोठे आव्हान अनुदानीत शाळांमधील शिक्षकांसमोर आहे.
विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकडीची मान्यता रद्द होण्याची भिती असते. परिणामी, काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा मोठा धोका या शिक्षकांवर ओढाऊ शकतो. एकेकाळी शिक्षकाला संपूर्ण गाव आदर्श मानून त्यांना मोठा सन्मान देत होते. पण काळाच्या ओघात नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.ग्रामीण भागातील शिक्षकांच्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळेच ग्रामीण भागातील पालक हा आपल्या पाल्यांना शहरातील शाळांमध्ये दाखल करतात. डोंजा येथील सर्वसामान्य पालकांची चिंता वाढली आहे. वास्तविक शहरात किंवा डोंजासारख्या भागात सारख्याच पदवीचे शिक्षक कार्यरत असताना शहरातील शाळांकडे पालकांचा कल वाढल्याने डोंज्यातील शिक्षकांनी आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे होऊन बसले आहे.
पालक सजग हवेत
डोंजा येथील शाळेतील शिक्षकांना ठरवून दिलेला अभ्यासक्रम हा पूर्ण झालेला आहे की नाही, या सर्व गोष्टी पालकांनी पाहिल्या तरच आपल्या पाल्याची प्रगती होऊन शाळेचे अस्तित्व अबाधित राहील, अन्यथा नाही. त्यासाठी पालक हा सजग असला पाहिजे.
-भागवत सिरसट, पालक, डोंजा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.