आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तेरणा अभियांत्रिकीच्या पर्यावरण; स्वच्छता अभियानाची सांगता

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ७ ते १३ जून दरम्यान पर्यावरण जनजागृती व स्वच्छता अभियान राबवण्यात आले. महाविद्यालयाच्या विविध विभागांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शहर व परिसरात अनेक ठिकाणी भेट देत स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयाचे वसतिगृह, तांडे तसेच बावी येथील वसंत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील स्वच्छता करण्यात आली.याअंतर्गत अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

या अभियानाची महाविद्यालयात विविध उपक्रमांनी सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी सुभाष चव्हाण, बाजीराव जाधवर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, उपप्राचार्य प्रा. एम. डी. पाटील, अकॅडमिक डीन डॉ. डी. डी. दाते, सर्व विभागप्रमुख, रासेयो समन्वयक प्रा. वंदना मैंदर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमानिमित्त प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत जनजागृती केली. सप्ताहात स्वच्छतेला हातभार लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ऐश्वर्या संक्राते हिने केले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

गाडगेबाबांचा आदर्श ठेवा
कवी सुभाष चव्हाण म्हणाले की, कवी असो किंवा कुठलाही व्यक्ती वातावरण स्वच्छ असेल तर त्याच्या कामाला प्रेरणा मिळते. जाधवर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांचा आदर्श ठेवावा. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, आमचे विद्यार्थी व कर्मचारी स्वच्छतेप्रती सजग असल्याचा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी यातून त्यांचे कौशल्य व समाजाप्रती बांधिलकी दाखवली. विद्यार्थीदशेत लागलेली शिस्त भावी आयुष्यात निश्चितच उपयोगी पडणार.

बातम्या आणखी आहेत...