आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला:‘तेरणा’सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो, सतरा वर्षांत 8 वेळा ओसंडला प्रकल्प

तेर / सुभाष कुलकर्णी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यात सर्वात मोठा तेरणा मध्यम ५ ऑगस्ट रोजी भरला आहे. प्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे सलग तिसऱ्या वर्षी धरण ओव्हरफ्लो झाले असून धरण १७ वर्षात ८ वेळेस धरण ओसंडले आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटल्याने दिलासा मिळाला आहे.जुलै झालेल्या व ऑगस्टमध्ये होत असलेल्या पावसामुळे ५ ऑगस्ट २०२२ रोजी तेरणा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. धरण भरण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तेर ग्रामस्थांना प्रत्यक्ष फायदा नसला तरी धरण भरल्याचे समाधान मात्र चेहऱ्यावर दिसून येत आहे. सलग तिसऱ्या वर्षी भरलेल्या धरणाचे पाणी पाहण्यासाठी धरणावर नागरिकांनी गर्दी केली आहे. गेली दोन वर्षात तेरणा धरण सप्टेंबर महिन्यातच परतीच्या पावसाने भरले होते. परंतु, यावर्षी धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भरले आहे.

यामुळे तेरणा नदी खळखळून वाहत आहे. तेर ढोकी येडशी तडवळा या चार गावची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या बंद असल्याने धरणात जुलैच्या प्रारंभी ४१.४२ टक्के पाणी शिल्लक होते. परंतु, जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने ३१ जुलै रोजी सकाळपर्यंत ८९.८६ टक्के पाणी धरणात जमा झाले होते. ५ ऑगस्ट रोजी अखेर हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तेरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू होऊन धरण ओसंडले आहे. जुलै महिन्यात तेरणा धरण परिक्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस झाला. यामुळे तेरणा धरणात झपाटल्याने पाणीसाठा झाला आहे. यामुळे यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच धरण ओव्हरफ्लो झाले आहे. याचा तेरसह उस्मानाबाद शहराला फायदा होणार आहे.

ऊस लागवडीच्या क्षेत्रात होणार वाढ
दोन वर्षांपासून तेरणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडत आहे. तेरणा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने परिसरात ऊसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रात अधिक वाढ झाली आहे. तसेच भाजीपाल्यासह अन्य बारमाही पिकांच्या लागवडीतही वाढ झाली आहे. परिसरात धरणाचे पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यंदाही धरण भरल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

धरणाजवळ गर्दी करू नये
२००६ ते २००८ व २०१० ते २०१६, २०१७, २०२० व २०२१, २०२२ मध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.धरण परिसरातील लोकांनी धरणाच्या जवळ गर्दी करू नये. अपुऱ्या मनुष्यबळामुळे जलसंपदा विभाग गर्दी नियंत्रण करू शकत नाही. प्रत्येक नागरिकांनी लहान मुलांना पाण्याच्या जवळ जाऊ देवू नये.
-धनंजय वरपे, शाखाधिकारी
तेरणा प्रकल्प.

बातम्या आणखी आहेत...