आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची ग्वाही; छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटविले

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य चौकात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातगाड्यांचे वाढलेले अतिक्रमण काढत नूतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी परिसर मोकळा केला. ही कारवाई बुधवारी (दि.१५) सकाळी करण्यात आली. मंगळवारी जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी शहरातील बेशिस्त संपवून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची ग्वाही दिली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी त्यांच्या या कार्याची प्रत्यय आला.

शहरातील बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हातगाडे, ऑटोरिक्षा, काळीपिवळी वाहनांचे अतिक्रमण वाढत असून, त्यामुळे पादचाऱ्यांना विशेषत: महिलांना प्रचंड त्रास होतो. याच भागात दोन दारू दुकाने असून, यामुळे मद्यपींचाही गदारोळ सुरू असतो. महापुरूषांचा पुतळा असलेल्या याच परिसरात अनेक अवैध धंदे सुरू असल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिले आणि बुधवारी सकाळी पोलिस पथकाला पाठवून अतिक्रमण हटविले. हातगाड्यांना रस्त्यावर उभे न राहण्यास बजावण्यात आले असून, त्यामुळे दोन्ही बाजंूचा रस्ता मोकळा झाला आहे.

प्रवाशांना लुटण्याचे प्रकार
बसस्थानकातून बाहेर आल्यानंतर रात्री अंधारात प्रवाशांच्या खिशातील पैसे, महिलांकडील दागिने लुटण्याचे प्रकार या परिसरात होत आहेत. या परिसरात दारू विक्रीची दोन दुकाने असून, मद्यपींचा रात्री उशिरापर्यंत धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे दारू दुकानांचे स्थलांतर या परिसराबाहेर करावे, प्रवाशांची लूटमार होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात २४ तास पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, सीसीटिव्ही बसवावेत, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...