आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना पक्के बिल, गरजेची खते देत नाही; शेतकरी संघटनेची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार

परंडा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना जीएसटीचे पक्के बिल व पाहिजे असलेली खते उपलब्ध असूनही देत नाहीत, अशी तक्रार शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील कृषी केंद्रचालक हे शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे व औषधे खरेदी केले असता पक्के बिल देत नाहीत. शेतकऱ्यांना पाहिजे असलेली खते देत नाहीत, कोणतेही खत घ्यायचे झाल्यास त्याबरोबर दुसऱ्या एक-दोन बॅग लादल्या जातात. जीएसटी बिल देत नसल्याने खतांच्या किंमती वाढवून त्यांच्या मनाने किंमती लावल्या जात आहेत.

शेतकऱ्यांची अडवणूक व पिळवणूक सुरू आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही लूट तत्काळ थांबवावी., दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने परंडा कृषी कार्यालय व तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक कारकर, नवजीवन चौधरी, पत्रकार गणेश गवारे, सुरेश कातुरे, कार्यकर्ते राजाभाऊ घोगरे, दत्ता गवारे, महेश माळी, हनुमंत पांगरे आदींची स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...