आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जिजामाता विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात विद्यार्थ्यांनी सादर केले. विविध गीतावर कलाविष्कार यावेळी सादर करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश पराग ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, प्रभारी तहसीलदार सुजित वाबळे, पोलीस निरीक्षक अमोद भुजबळ, गटशिक्षण अधिकारी सुर्यभान हाके, सचिव काकासाहेब साळुंके, ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, माजी नगरसेवक संजय घाडगे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे सत्यजीत, अमर साळुंके, अंकित साळुंके आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ता साळुंके यांनी चिमुकल्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना स्टेजवर काम करण्याचे साहस यावे या उद्देशाने आयोजीत केलेल्या या स्नेहसंमेलन प्रसंगी बालकलाकार चिमुकल्यांचे कौतुक करुन यांना प्रोत्साहन दिले.
शाळेच्या बालवाडी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कोळीगीत, भक्तीगीत, शेतकरी गीत, लावणी, कोरोना थीम, मुकाभिनय, नाटके, गीत गायन करून बहारदार नृत्याविष्कार सादर केला.बाल विद्यार्थ्यानी सादर केलेल्या कला गुणांना रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या माध्यमातून प्रतिसाद दिला. आवश्यक ठिकाणी संगीताची साथे देण्यात आली. सुत्रसंचालन नितीन पाबळे, अनुष्का काळे, आली पल्ला, अनुष्का बल्लाळ यांनी केले तर आभार संतोष पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाने, शिला कांबळे, मंगल हिंगणकर, तबस्सुम मोमीन, देशमुख सुजाता, सुवर्णा आगरकर, आश्विनी जगताप, अश्विनी गवारे अश्वीनी कोठावळे आदीनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.