आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:शेतकऱ्याकडे शेती पंपाची 30 कोटीच्या आसपास थकबाकी

कळंब3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांकडे शेती पंपाची ३० कोटी च्या आसपास थकबाकीमुळे महावितरण कंपनीने वसुली करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे वसुली करताना सक्ती करण्यात येऊ नये असा आदेश महावितरण संचालक यांनी दिलेला आहे. खरीप हंगामातील पिके ही पाण्याविना वाया गेलेली आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे रब्बी हंगामात पेरणी सुद्धा करता आली नव्हती. शेतातील खर्च आणि आलेले उत्पन्न याचा ताळमेळ न बसल्यामुळे बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे.

त्यामुळे विहीर व बोअरवेल ची पाणी पातळी वाढली असून या वर्षी रब्बी हंगाम चांगली होईल आणि कर्जाचा डोंगर कमी होईल ही आशा शेतकऱ्यांना आहे. महावितरण कंपनीने वीज भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांना डेडलाईन दिली होती. परंतु शेतकऱ्यांनी विज बिल न भरल्यामुळे महावितरणने कृषी पंपाची वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. शेतकऱ्यांनी कृषी पंपाची थकबाकी भरावी असे अवाहन करण्यात आले आहे. कळंब तालुक्यातील शेतीला विद्युत पुरवठा करण्यासाठी २३०० रोहित्रे बसवण्यात आली आहेत. यावर २९ हजार ग्राहकांच्या शेती पंपांना महावितरण विद्युत पुरवठा करते. या शेतकऱ्यांकडे ३० कोटी थकबाकी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...